Urinary Incontinence

हसताना, शिंकताना किंवा पोझिशन बदलताना, अचानक लघवी गळून जाणे किंवालघवी करण्याची तीव्र भावना येवून ती आवरता न येणे म्हणजे युरिनरी इन्कॉंटिनंस.

याचे प्रमाण थेंबभर किंवा त्यापेक्षा अतिशय जास्ती असे कितीही असू शकते.

हा आजार नसून एक लक्षण आहे.

स्त्रियांमध्ये गर्भधारणा, प्रसूती,अतिरिक्त वजन आणि मेनोपॉज या घटना युरिनरी इन्कॉंटिनंस ची लक्षणे येण्यास कारणीभूत असतात.

अनेक स्त्रियांना या बाबत बोलायला संकोच वाटतो आणि अनेक स्त्रियांचा असा गैरसमज ही आहे ही वयोमानानुसार असे होणे नॉर्मल आहे.परंतु तसे नाही. योग्य निदान आणि उपचारांच्या सहाय्याने ही लक्षणे आटोक्यात आणता येतात आणि नॉर्मल आयुष्य जगता येऊ शकते. नवीन औषधे,शस्त्रक्रिया आणि सुधारित तपासणी तंत्रज्ञान यामुळे या लक्षणाचा उपाय चांगला होऊ शकतो.

  • अर्जन्सी: अतिशय घाईने, ताबडतोब लघवीसाठी जाण्याची भावना येणे.
  • फ्रिक्वेन्सी: वारंवार,नेहमीपेक्षा कमी वेळात, पुन्हा पुन्हा लघवी साठी जावे लागणे
  • नॉक्टुरिया: रात्री झोपेतून उठून लघवीला जावे लागणे
  • डिसयुरिया: लघवी करताना अथवा झाल्यानंतर ठणक लागणे.
  • नॉक्टरनल एनुरेसिस: झोपे मध्ये लघवी होऊन जाणे.
  • स्ट्रेस युरिनरी इन्कॉंटिनंस : शिंकताना, खोकताना, हसताना लघवी गळून जाणे, भरभर चालताना, पळताना, व्यायाम करताना कधीकधी लघवी गळून जाणे.
  • अर्जन्सी इन्कॉंटिनंस :अतिशय तीव्र अशी लघवी करण्याची भावना येणे व तेव्हा लघवी रोखून धरतात न आल्याने लघवी गळून जाणे. असा त्रास असणाऱ्या स्त्रियांना वॉशरूम पर्यंत पोहोचेपर्यंत किंवा कपडे काढेपर्यंत एक-दोन थेंब किंवा त्यापेक्षा जास्त लघवी गळून जाते.
  • मिक्सड् युरिनरी इनकाँटेनन्स :यामध्ये स्त्रीस दोन्ही प्रकारची लक्षणे दिसतात.
  • ओव्हरफ्लो इन्कॉंटिनंस :यामध्ये मूत्राशय अतिशय जास्त भरले गेल्याने लघवी गळून जाते.

इन्कॉंटिनंसच्या प्रकारानुसार त्याची कारणे वेगळी असतात. तरीही ढोबळ मानाने इन्कॉंटिनंस होण्यामागची कारणे:

ओटीपोटाच्या तळाचे स्नायू म्हणजे पेल्व्हिक फ्लोअर चे स्नायू कमकुवत झाल्याने, त्यांचाआधार मिळणारे अवयव जसे मुत्राशय,गुदाशय आणि गर्भपिशवी खाली सरकते.यामुळे मूत्राशय व मुत्रिका यामधील कोन बिघडतो आणि स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनंसची लक्षणे येतात.

मूत्राशयाचा आणि मुत्रिके (युरेथ्रा) च्या वर्तुळाकार स्नायूंचा (स्पिंघ्टर)कमकुवतपणा ,मुत्राशयाच्या स्नायूंची जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटी(ओव्हरऍक्टिव्ह ब्लॅडर) यामुळे अर्ज इनकाँटेनन्स ची लक्षणे येतात

मुत्राशयाच्या आउटलेटवरील गाठ/खडा यामुळे लघवी बाहेर टाकण्यास अडथळा होऊन, त्यामुळे इन्कॉंटिनंसच्या तक्रारी येतात.

काही औषधे(डायुरेटिक्स),

इन्फेक्शन,कॉन्स्टिपेशन.

वयोमानानुसार होणारे मेंदूतील बदल, चेता संस्थेतील बिघाड यामुळेही लघवी वरचा कंट्रोल कमी होतो काही आजार जसे पार्किन्सन्स डिसीज ,डायबिटीस ,मल्टिपल स्क्लेरॉसिस यामुळेही इन्कॉंटिनंस होण्याची शक्यता अधिक असते.

६०-७५ वयोगटातील स्त्रियांमध्ये वर उल्लेखिलेल्या कारणांबरोबरच संधिवातासारख्या आजारामुळे हालचाल करणे सावकाश आणि दुखरे झाल्यामुळेही लघवी गळून जाण्याचे प्रमाण वाढते.

निदान करण्यासाठी खालील पद्धती वापरली जाते.

मेडिकल हिस्ट्री तुमच्या लक्षणांविषयीची सखोल माहिती तुम्हाला प्रश्न विचारून घेतली जाते. यासाठी कधीकधी ब्लॅडर डायरी ठेवण्याचाही सल्ला दिला जातो ज्यामध्ये काही दिवसांसाठी तुमच्या लघवीला जाण्याच्या वेळा, किती प्रमाणात लघवी झाली ,गळून जाण्याचे प्रमाण, इत्यादी गोष्टींची नोंद ठेवायला सांगितले जाते व त्यावरून इन्कॉंटिनंसच्या प्रकाराचा आणि प्रमाणाचा अंदाज घेतला जातो.

यामध्ये योनिमार्गाद्वारे तपासणी करून प्रोलॅप्स म्हणजे अंग खाली घसरले आहे का ते पाहिले जाते.

खोकला करायला सांगून त्यावेळेस लघवी गळून जाते आहे का ते पाहिले जाते.

पॅड वापरून ते किती प्रमाणात लघवी मुळे भिजले आहे ते पाहिले जाते.

The Questionnaire for female Urinary Incontinence Diagnosis (QUID)

None of the time Rarely Once in awhile Often Most of the time All of the time
Do you leak urine (even small drops), wet yourself, or wet your pads or undergarments...
1. when you cough or sneeze?
2. when you bend down or lift something up?
3. when you walk quickly, jog or exercise?
4. while you are undressing in order to use the toilet?
5. Do you get such a strong and uncomfortable need to urinate that you leak urine (even small drops) or wet yourself before reaching the toilet?
6. Do you have to rush to the bathroom because you get a sudden, strong need to urinate?
Scoring :Each item scores 0 (None of the time), 1 (Rarely), 2 (Once in a while), 3 (Often), 4 (Most of the time) or 5 (All of the time). Responses to items 1, 2 and 3 are summed for the Stress score and responses to items 4, 5, and 6 are summed for the Urge score.

मुत्राशयाची सोनोग्राफी: यामध्ये मूत्राशयात किती लघवी साठवली जाते आहे आणि लघवी करून आल्यानंतरही किती लघवी शिल्लक राहते आहे,( पोस्ट व्हॉइड रेसिड्यूअल यूरिन) हे पाहिले जाते.

सिस्टोस्कोपी:दुर्बिणी द्वारे मूत्राशयाची तपासणी यामध्ये मूत्राशयामध्ये ट्युमर किंवा खडा किंवा इतर काही दोष आहेत का ते पाहिले जाते.

युरो डायनामिक : या तपासणीमध्ये मूत्राशय आणि मुत्रिका यांच्या लघवी धरून ठेवण्याच्या आणि बाहेर टाकण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला जातो. यामध्ये मुख्यत्वे हे काम करणाऱ्या वर्तुळाकार स्नायूंच्या (स्पिंघ्टर) क्षमतेचा अंदाज येतो.

सिस्टोमेट्रोग्राम,व्हॉइडिंग प्रेशर स्टडी,व्हाल्साल्वा लीक पॉईंट स्टडी अशा काही ऍडव्हान्स्ड तपासण्या करून दोष नक्की कुठे आहे किती प्रमाणात आहे या बाबतीत माहिती मिळवून त्यानुसार इन्कॉंटिनंसच्या प्रकाराबाबत खात्री करुन उपाय योजना केल्या जातात.

अर्ज इनकाँटेनन्स आणि स्ट्रेस युरिनरी इनकाँटेनन्स ही लक्षणे स्त्रियांमध्ये येऊ नयेत म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आल्यास ही लक्षणे आटोक्यात राहावीत म्हणून करावयाचे उपाय:

स्थूलपणा असलेल्या स्त्रियांमध्ये याचा त्रास अधिक होतो त्यामुळे नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊन आपले वजन आटोक्यात ठेवणे. ज्यांना डायबिटीस आहे अशा स्त्रियांनी आपले वजन आणि साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवणे. फिजिकल थेरपी :म्हणजेच

किगल एक्सरसाइज ओटीपोटाच्या तळाचे स्नायू (पेल्व्हिक फ्लोअर चे स्नायू) यांचा नियमितपणे व्यायाम करणे.हा व्यायामप्रकार शिकण्यास सोपा असून कधीही ,कुठेही करता येतो.यातील बायोफीडबॅक पध्दतीमुळे जास्त अचूकता साधता येते.( https://www.youtube.com/watch?v=wRKhtfbJHdo ) व्हजायनल वेटस् वापरूनही हे व्यायाम करता येतात.

ब्लॅडर ट्रेनिंग: ठराविक वेळेला लघवीला जाऊन येणे, व्यायाम करण्याआधी लघवीला जाऊन येणे. जड वजन उचलणे टाळणे झोपण्याआधी काही तास कॉफी आणि अतिरिक्त पातळ पदार्थ/पाणी पिणे टाळणे.

उपचार:

इन्कॉंटिनन्स च्या प्रकार आणि तीव्रतेनुसार उपाययोजना ठरवल्या जातात.

मेडिकल मॅनेजमेंट:

मुत्राशयाचे अनावश्यक आकुंचन कमी करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. यामध्ये इंजेक्शनच्या, गोळ्यांच्या स्वरूपात औषधे दिली जातात .

सपोर्टिंग डिव्हायसेस:

योनि मार्गामध्ये ठेवायच्या कोन्स/ पेसरी,युरेथ्रामध्ये बसवण्याच्या पेसरी,अशा उपकरणांचा वापर केला जातो.

शस्त्रक्रिया:

स्लिंग,कॉल्पो सस्पेन्शन, युरेथ्रल बॅकिंग अशा प्रकारच्या शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. तसेच सेक्रल न्यूरो मॉड्युलेशन,पर क्युटेनियस टिबियल नर्व्हस स्टिम्युलेशन एम्सेला चेअरअसेही काही उपाय आहेत.