पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ( पी सी ओ डी)

 • पाळीची अनियमितता जसे पाळी न येणे उशिरा उशिरा येणे किंवा वारंवार येणे
 • अतिरिक्त रक्तस्त्राव किंवा खूप कमी रक्तस्त्राव.
 • गर्भधारणेस अडथळा

 • चेहरा पोट मांड्यांवर केस वाढणे (Ferriman-Gallway rating)
 • चेहऱ्यावर पाठीवर छातीवर ऍक्नी येणे
 • ओव्हरीज मध्ये पाणी भरलेल्या बुडबुड्यासारख्या सिस्ट तयार होणे

 • मासिक पाळीची अनियमितता
 • सोनोग्राफीमध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट दिसणे, आकार वाढलेला असणे
 • सोनोग्राफी च्या सहाय्याने स्त्रीबीज बनण्याची क्रिया होत नसल्याची खात्री करून घेणे
 • शरीरातील हार्मोन्सच्या तपासण्या
 • स्त्रीबीज नियमित बनत नाही
 • गर्भाशयातील आतले आवरण इंडोमेट्रियम गर्भधारणेस अनुकूल अशा स्वरुपात तयार होत नाही
 • गर्भधारणेस योग्य असे हार्मोन्सचे प्रमाण राहत नाही

प्रत्येक व्यक्तीला दिसणारी लक्षणे, मुख्य म्हणजे पेशंटला प्रेग्नेंसी रहायला हवी आहे किंवा नाही आणि आरोग्याच्या इतर तक्रारी यानुसार उपाय ठरवला जातो. प्रेग्नेंसी हवी असल्यास स्त्रीबीज बनवण्याच्या दृष्टीने उपाय केले जातात. अन्यथा पाळी नियमित यावी अशी औषधे दिली जातात

 • पीसीओडी मध्ये शरीरातील पेशी इन्शुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत,परिणामतःसाखरेचे रक्तातले प्रमाण वाढते आणि त्यामुळे डायबेटिस होण्याची शक्यता वाढते.
 • स्थूलपणा पण जास्त प्रमाणात वाढतो. घोरणे, यामुळे झोप पुरेशी न होणे आणि स्लीप ऍप्निया याचा धोका वाढतो
 • मानसिकता बदलल्यामुळे अशा पेशंटला डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.
 • याखेरीज गर्भाशयातील आवरणाची जास्त प्रमाणात वाढ झाल्याने त्याच्या कॅन्सरचा धोका वाढतो
 • तसेच स्थूलपणा, साखरेचे वाढलेले प्रमाण आणि त्या बरोबर शरीरातील आरोग्यास घातक घटकांचे प्रमाण वाढल्यामुळे(हायपरलिपिडेमिया) अशा पेशंट्सना हृदयविकाराचा त्रास संभवू शकतो

कारण या औषधाच्या वापराने शरीराची इन्शुलीन वापरण्याची क्रिया सुधारते बरोबरीनेच अँड्रोजेनचे प्रमाण कमी होऊन ओव्हुलेशन होण्याची शक्यता वाढते. ओव्ह्यूलेशन नियमीत झाल्यास मासिक पाळी नियमित येण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे या गोळ्यांचा फायदा होतो

जीवनशैलीमध्ये बदल, आहार, व्यायाम, तणावाचे नियोजन आणि वजन घटवणे याचा फायदा पीसीओडीच्या रुग्णांना नक्कीच मिळतो.

आहार : कर्बोदके कमी प्रमाणात असणारे पदार्थ घ्यावेत. गोड पदार्थ टाळावेत . दिवसातून तीन ते चार वेळेला खावे आणि पाणी भरपूर प्यावे.आवश्यकता असल्यास आहार तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

व्यायाम : एरोबिक,योगासने आणि रेझिसस्टन्स एक्सरसाइज या प्रकारचा व्यायाम अवश्य करावा. चालणे,धावणे,योगासने ,वजन उचलण्यांचा व्यायाम या प्रकारचा योग्य समतोल साधून व्यायाम करा.

वजन घटणे :ज्यांचे वजन जास्त आहे ( बीएमआय 25 पेक्षा जास्त) त्यांनी वजन कमी केल्यास पाळी नियमित होण्यास मदत होते वजन घटवण्याने इन्शुलिनचे प्रमाणही कमी होते,साखरेचे प्रमाण सुधारते.अतिरिक्त केस(Hirsutism)आणि ऍक्नीचे प्रमाणही कमी होते

ताणतणावांचे नियोजन : मुख्यत्वेकरून शांत झोप आणि योगासने, मेडिटेशन याचा सराव करावा. नियमितता येण्यास मदतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करावा.

आहारात समावेश करा आहारातून वर्ज्य /कमी करा
कोबी फ्लॉवर ब्रोकोली कडधान्य डाळी तेलबिया रताळ लाल भोपळा व्हाईट ब्रेड मफिन्स पेस्ट्रीज गोड पदार्थ बर्गर पिझ्झा पास्ता नूडल्स कॉम्प्लेक्स
लीन प्रोटीन टोफू चिकन मासा साखरेचे जास्त प्रमाण असलेले सोडा तयार ज्यूस फ्लेवर्ड वॉटर एनर्जी ड्रिंक स्पोर्ट ड्रीम चहा-कॉफी
anti-inflammatory टोमॅटो पालक बदाम अक्रोड ऑलिव्ह ऑइल स्ट्रॉबेरी ब्लूबेरी इन्फ्लामे टरी पदार्थ जसे तळलेले पदार्थ रेड मीट मटन मार्गारीन