इन्फर्टिलिटी ट्रीटमेन्ट

  • गर्भधारणा होत नसल्यास,त्याचे कारण शोधून त्यानुसार औषधोपचार ,गरज असल्यास शस्त्रक्रिया करून उपचार करणे,ज्यामुळे स्त्रीला गर्भधारणा होईल म्हणजेच व्यंध्यत्व निवारण उपचार.
  • या मध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमधील दोषांचा व उपचाराचा विचार केला जातो.

  • एखाद्या जोडप्यास,दोघांचे आरोग्य चांगले असताना ,गर्भनिरोधके न वापरता एक वर्षभर नियमित शारीरिक समंध ठेऊन दिवस राहत नसतील तर अशा जोडप्याने.
  • जोडप्यापैकी कोणालाही गर्भधारणा होण्यास विलंब होईल अशा प्रकारच्या काही आजार असल्यास त्यांनी,जसे स्रीयांमध्ये पीसीओडी ,पाळीची अनियमितता एन्डोमेट्रोयोसीस,
  • पुरुषांमधले काही दोष
  • जोड्प्यामधील दोघांचे/एकाचे वय तीस पेक्षा जास्त असल्यास.
  • स्रीयांनी पाळीच्या दुसऱ्या/तिसऱ्या दिवशी व न जमल्यास चौदाव्या दिवशी
  • पुरुषांनी-सलग चार दिवस शारिरिक संबंध (INTERCOURSE) टाळून / न ठेवता त्यानंतर लगेच पाचव्या दिवशी.

माहिती घेणे/हिस्टरी टेकिंग.

  • तुमची आरोग्यविषय सविस्तर माहिती घेतली जाईल,जसे पूर्वीचा आजार,शस्त्रक्रिया,टी बी, औषधोपचार इत्यादी.
  • शारिरिक संमंधाविषयीची माहिती .
  • गर्भ निरोधके वापरली असल्यास त्याबाबत माहिती

तपासणी

  • वजन –उंची तपासून बी एम आय काढला जाईल
  • जनरल चेक अप
  • स्रीची योनी मार्गातून तपासणी (INTERNAL CHECK –UP)
  • सोनोग्राफी
  • एच एस जी
  • पुरुषांनी सीमेन एनालिसिस
  • रक्त, लघवीच्या टेस्ट
  • स्रीची: पाळीच्या दुसऱ्या आणि चौदाव्या दिवशी
  • कशासाठी - गर्भाशयातील दोष-जसे गाठी – फायबॉइडस, इंडोमेट्रियम,ओव्हरीमधील –एन्ट्रल फॉलिकलची संख्या व वाढ बघण्यासाठी व इतर आवश्यक माहितीसाठी
  • कधी- पाळीच्या ६ ते १० व्या दिवसामध्ये
  • कशासाठी- फॅलोपियन ट्युबज् (गर्भनलिका ) मोकळ्या आहेत की नाही हे पहिले जाते तसेच गर्भपिशवीचा आकार आत मधून योग्य आहे कि नाही इत्यादी माहिती मिळते.
  • गर्भपिशवी मध्ये औषध सोडून एक्स-रे काढला जातो.
  • कधी- चार दिवस शारीरिक संमंध न ठेवता त्या नंतर
  • कशासाठी – शुक्रजंतूचे(स्पर्म) प्रमाण आकार ,हालचाल अबनॉर्मल स्पर्मस ,फ्रुक्टोज टेस्ट या माहितीसाठी सॅम्पल मास्टर बेशन पद्धतीने कलेक्ट केले जाते.
  • कधी - ब्लड टेस्ट –डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार (CBC,BLOOD SUGAR ,HIV, HbSAg,VDRL,TSH AND URINE EXAMINATION)
  • हारमोन्सच्या टेस्ट –(FSH LH Prolactin,AMH ) पाळीच्या दुसऱ्या दिवशी
  • पुरुषाच्या ब्लड व हारमोन्सच्या टेस्ट गरजेनुसार सांगितल्या जातात
  • पाळीच्या दुसऱ्या दिवशी –बेस लाईन स्कॅन होतो.
  • पाच-सहा दिवसांसाठी औषधे/इंजेक्शन्स दिली जातात
  • पाळीच्या सातव्या दिवसापासून सोनोग्राफी होते
  • फॉलीकल्स चा आकार व एन्डोमेट्रीयमची जाडी मोजली जाते
  • फॉलीकल्स पूर्ण वाढल्यावर ओव्ह्युलेशन साठी इंजेक्शन दिले जाते
  • ३६ तासानंतर पुन्हा सोनोग्राफी होते
  • ओव्ह्युलेशन झाल्यास ,केसनुसार योग्य वेळेस शारिरिक संमंध ठेवण्याचा किंवा आय यु आय चा सल्ला दिला जातो
  • यानंतर चौदा दिवसांसाठी प्रोजेस्टेरॉन च्या गोळ्या दिल्या जातात
  • या सोनोग्राफीत फॉलीकल्सच्या वाढीतले दोष,ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम, एन्डोमेट्रीयमचे दोष या बाबतही माहिती मिळते.
  • पुरुषाचे वीर्य प्रकिया करून त्यातले चांगली हालचाल असलेले शुक्रजंतू बारिक नळीच्या मदतीने ओव्ह्युलेशन झाल्यानंतर गर्भपिशवीत सोडले जातात. ही एक ओपीडी प्रोसिज़र आहे.

कोणाबाबत

  • दिवस न राहण्यास पुरुषातील दोष कारणीभूत असल्यास
  • स्री मधील इतर दोष
  • कारण न समजलेले व्यन्ध्यत्व या मध्ये यश मिळण्याची शक्यता १०% ते २०% असते.

कोणाबाबत?

  • अनेक वर्षाची इन्फटिलिटीची तक्रार, एन्डोमेटियोसीस असण्याची शक्यता
  • दोन्ही नळ्या बंद असल्यास,आय यु आय मध्ये अपयश आल्यास
  • कधी- पाळीच्या पाचव्या ते दहाव्या दिवसामध्ये.
  • यासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज असते.ही फ्रोसिजर निदान आणि उपचार दोन्हीसाठी उपयुक्त आहे. यासाठी पूर्ण भूल देऊन पोटामध्ये लॅप्रोरोस्कोप टाकला जातो.
  • कोणाबाबत – लॅपरोस्कोपी सोबत –अधिक माहितीसाठी, गर्भशयाचे दोष, नळ्या बंद असल्यास , पॉलिप, फायब्रॉइड एन्डोमेट्रीयम चांगले नसल्यास
  • कधी- पाळीच्या पाचव्या ते दहाव्या दिवसांमध्ये. निदानसोबत उपचारासाठी ही उपयुक्त- जसे पॉलिप काढणे, गर्भशया तील पडदा काढणे, चिकट आवरणे काढणे, कॉर्नुअल कॅथेटरायझेशन व इतर.

कोणामध्ये

  • दोन्ही नळ्या बंद ,आय यू आय चे बरेच प्रयत्न अयशस्वी झाल्यास ,पुरुषांमध्ये उपचारास प्रतिसाद न देणारे दोष, सिव्हियर एन्डोमेट्रीयोसिस व इतर.

कशाप्रकारे

  • औषधांच्या मदतीने जास्त संख्येने फॉलिकल्स वाढवली जातात व सोनोग्राफीच्या मदतीने स्रीबीज गोळाकरून शुक्रजजंतू बरोबर लॅब मध्ये फलन प्रक्रिये साठी ठेवतात तयार एम्ब्रयो तपासून गर्भशयात सोडले जातात.
    यशस्वी होण्याची शक्यता -३०-४०-% एका ट्रीटमेंटच्या सायकलसाठी