मासिक पाळी

  • २१ ते ३५ दिवसांचे असते
  • यात ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होतो.
  • साधारण ८०मि.ली.एवढे (किंवा काहींना यापेक्षा कमी) रक्तस्त्राव होतो.

ज्या दिवशी अंगावर जाणे सुरू झाले तो दिवस एक/पहिला धरावा.

  • मासिक पाळीचे चक्र किती दिवसांचे आहे
  • किती दिवस रक्तस्त्राव होतो
  • रक्तस्त्राव किती प्रमाणात होतो.
  • यासाठी पिक्टोरल ब्लड फ्लो असेसमेंट चार्ट (PBAC)वापरु शकता.
  • गुगल वर PBAC Images असे सर्च केल्यास काही तयार चार्ट पहायला मिळतील.
  • पोट दुखण्याचे प्रमाण व दिवस.
  • ट्रॅक ठेवण्यासाठी काही ऍपस् आहेत,उदा.फ्लो हे ऍप.(Flow)

घरगुती पॅड, सॅनिटरी नॅपकिन,टॅम्पून,मेंन्स्ट्रुअल कप्स, रेडिमेड कॉटन पॅड.

हा चॉईस अतिशय वैयक्तिक आहे आणि परिस्थिती, रक्तस्त्राव,दिवस/रात्र,अशा काही बाबींवर ते अवलंबून आहे.

कोणतेही साधन वापरले तरी ते सहा तासांनी (गरज असल्यास आधी)बदलले पाहिजे.

पुन्हापुन्हा वापरायच्या साधनांबाबत काटेकोरपणे स्वच्छ्ता पाळली पाहिजे, तसेच वापरून टाकून देण्याच्या साधनांची ही योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे.

https://www.greenthered.in या वेबसाईटवर उपलब्ध माहिती जरूर पहा.

मासिक पाळीच्या साधारण आठ ते 10 दिवस आधी काही स्त्रियांना काही लक्षणे जाणवतात जसे

  • स्तने जड होणे, दुखणे
  • पोट फुगल्यासारखे होणे
  • मळमळ, उलट्या होणे.
  • काही पेशंटला डोकेदुखीचा-मायग्रेनचा त्रास ही जाणवतो.
  • काही पेशंट्सना या काळामध्ये भावनिक असंतुलन चिडचिडेपणा,अति हळवेपणा, मूड स्विंग्ज असेही त्रास जाणवतात.

शरीरात होणाऱ्या हार्मोन्सचे बदल व असंतुलन यामुळे हा त्रास होतो.(प्रेग्नंसीच्या सुरवातीला ही अशी लक्षणे जाणवतात) काही प्रमाणात मानसिक ताणतणावही यास कारणीभूत होतात.

लक्षणे कमी करण्यासाठी औषधोपचारांची गरज लागू शकते. याशिवाय योग्य आहार,व्यायाम ,झोप नीट घेणे आणि जीवनशैली मध्ये सुधारणा करणे याचाही फायदा होतो.

२० दिवसांपेक्षा कमी अथवा ३५ दिवसांपेक्षा जास्त उशीरा आणि बदलत्या कालावधीने येणारी पाळी.

  • मुलींला पाळीची सुरुवात झाल्यानंतरचे दीड ते दोन वर्षे,
  • बाळंतपणानंतरचे एक ते दीड वर्ष
  • आणि रजोनिवृत्तीच्या काळात पाळी अनियमित होणे नैसर्गिक आहे. आरोग्यावर परिणाम होत असल्यास उपचारांची गरज लागते.
  • काही स्त्रियांना ओवह्यूलेशन होताना रक्तस्त्राव होतो.(mid cycle bleeding)त्यालाही सहसा उपचार लागत नाही.

याव्यतिरिक्त जर पाळी अनियमित असेल व पाळी येण्याआधी किंवा येऊन गेल्यानंतर अधून-मधून वारंवार कमी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर त्यासाठी स्त्री-रोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कारण अशा तक्रारी हॉर्मोनल इम्बॅलन्स थायरॉईडचे आजार,इंडोमेट्रियल पॉलिप,गर्भाशयातील गाठी, गर्भाशय मुखावरील जखम,प्रेग्नंसीची कॉम्प्लिकेशनस् आणि कॅन्सर यामुळे ही होऊ शकतात.

  • मासिक पाळीचा रक्तस्त्राव ८०मि.ली.पेक्षा जास्त जाते,
  • रक्तस्त्रावा बरोबर रक्ताच्या गाठी,गुठळ्या जाते,
  • घेतलेले पॅड दर तासा-दोन तासाला बदलण्याची गरज पडते,
  • पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस अंगावर जाणे
  • अशी लक्षणे असल्यास अतिरिक्त रक्तस्त्रावाची कारणे शोधण्यासाठी तपासण्या करून मग उपचार करावे लागतात.
  • कारणे : गर्भाशयातील गाठी,ऍडिनोमायोसिस,पॉलिप,ए.यू.बी.
  • जास्त रक्त वाहून गेल्यामुळे ऍनीमियाचा त्रास होतो.थकवा येणे व काही प्रमाणात यांचा मानसिक ताण ही येतो.जास्तीचा रक्तस्त्राव आणि सततचा पॅडचा वापर यामुळे योनीमार्गात खाज,जळजळ जाणवते.
  • अती रक्तस्त्राव जाण्यामागे काय कारण आहे हे समजण्यासाठी रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी इ.करावे लागते व कारणानुसार उपाय केले जातात.

मासिक पाळी येण्यापूर्वी पोट दुखणे, पाळीच्या वेळी दुखणे आणि दुखण्याची तीव्रता यानुसार निदान व उपचार केले जातात. सहसा मल्टी विटामिन गोळ्या व दुखणे कमी करण्याच्या गोळ्या यामुळे समाधान कारक परिणाम होतो.

याखेरीज योग्य आहार, व्यायाम व जीवनशैलीतले बदल यामुळेही फायदा होतो. एन्डोमेट्रिओसिस,ऍडिनोमायोसिस,पि.आय.डी.अशा संभाव्य कारणांचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते.कारणांनुसार उपाययोजना कराव्या लागतात.

याचा प्रत्यक्ष संबंध हॉर्मोन्सशी आहे. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर पहिले दीड वर्ष,डिलिव्हरी नंतर ,स्तनपान चालू असताना आणि रजोनिवृत्तीचा काळ जवळ आल्यानंतर पाळी अनियमित होते हे नैसर्गिक आहे पण

  • पाळी लांबवण्यासाठी किंवा आधी येण्यासाठी स्वतःच्या मनाने अयोग्य प्रमाणात गोळ्या घेणे.
  • इमर्जन्सि गर्भनिरोधकाचा गैरवापर. यांचाही परिणाम मासिक पाळी वर होतो.