साधारण एक वर्षभर नियमितपणे शारीरिक संबंध ठेवून एखाद्या जोडप्यास प्रेग्नेंसी राहत नसेल तर अशा जोडप्यास इनफर्टिलिटी चा त्रास/आजार आहे असे म्हंटले जाते.
ज्या जोडप्यांमध्ये स्त्रीचे वय तीस किंवा जास्त आहे,
ओटीपोटाच्या भागात पूर्वी काही ऑपरेशन झाले आहे,
पूर्वीपासूनचा काही आजार आहे,
अशा जोडप्यांना उपचार करुन घ्यायचा सल्ला दिला जातो
यामध्ये प्रेग्नेंसी न राहण्यास कारणीभूत असलेल्या स्त्री व पुरुषांमधील बाबींचा तपास केला जातो.
१) हिस्ट्री टेकिंग
यामध्ये स्त्री व पुरुष दोघांचीही आरोग्य विषयक माहिती व तक्रारी नोंदल्या जातात
जुना आजार व औषधोपचार याविषयी माहिती घेतली जाते
शारीरिक संबंध करण्याची फ्रिक्वेन्सी व याबाबत येणाऱ्या अडचणी याची माहिती घेतली जाते
पूर्वी घेतलेल्या व सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती
आहार व जीवन शैली याविषयीची माहिती
२) वैद्यकीय तपासणी
प्राथमिक तपासणी व स्त्रीची जननेंद्रियाची तपासणी ज्याला वैद्यकीय परिभाषेत गायनॅक चेकअप किंवा इंटरनल एक्झामिनेशन म्हणतात ती केली जाते.
३) काही तपासण्या:
मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी टीव्हीएस सोनोग्राफी
रक्ताच्या तपासण्या
हार्मोन्सच्या तपासण्या
मासिक पाळीच्या सातव्या ते दहाव्या दिवसांमध्ये एच एस जी, ज्याद्वारे गर्भनलिका मोकळ्या आहेत किंवा नाही ते पाहिले जाते
मासिक पाळीच्या चौदाव्या दिवशी सोनोग्राफी करुन गर्भाशयातील आवरण आणि स्त्री बीज तयार होण्याची बाहेर पडण्याची क्रिया झाली आहे किंवा नाही ते पाहिले जाते
४) पुरुषाच्या बाबतीत सिमेन ऍनालिसिस ही तपासणी केली जाते
५) यावरून प्रेग्नेंसी न राहण्याचे कारण स्त्रीमध्ये/ पुरुषांमध्ये किंवा दोघांमध्ये आहे याचे निदान होऊ शकते व त्या कारणानुसार उपचार सुरू केले जातात.
६) तपासणी नंतरही कारणाचा शोध न लागल्यास मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्त्री बीज बनण्याची क्रिया उत्तेजित केली जाते (Ovulation Stimulation). ज्या दिवशी स्त्री बीज तयार होऊन बाहेर पडेल त्यादिवशी सीमेन ऍनालिसिस च्या गुणवत्तेनुसार , त्यावेळी (टाईमली )इंटरकोर्स ठेवण्यास सांगितला जातो किंवा आय यु आय चा सल्ला दिला जातो.
पुरुषांमधील कारणांचा तपास करताना खालील प्रमाणे उपाय योजना केल्या जातात
१) हिस्ट्री टेकिंग
२) प्राथमिक तपासणी आणि जननेंद्रियाची तपासणी
३) सिमेन ऍनालिसिस
सिमेन तपासणीसाठी देताना तीन दिवस आधी संबंध ठेवू नये.
सिमेन जमा केल्यावर ताबडतोब तपासणीसाठी द्यावे.
रिपोर्ट मध्ये काही दोष आल्यास एक महिना थांबून परत तपासणी करावी.
रिपोर्ट मध्ये वापरण्यात येणारे काही शब्द व त्याचे अर्थ
Oligospermia |
शुक्राणूंची संख्या कमी |
Asthenospermia |
शुक्राणूंची हालचाल कमी |
Azoospermia |
शुक्राणू अजिबात नसणे |
Teratozoospermia |
मेलेले शुक्राणू |
नॉर्मल सिमेनचे (डब्ल्यू एच ओ)मानांकित प्रमाण
व्हॉल्यूम |
=\>१.५मि.ली. |
मीलिलीटर मध्ये. प्रमाण |
स्पर्म कॉन्सिंट्रेशन |
=\>१५ |
शुक्राणूंचे एकत्रित प्रमाण |
टोटल मोटिलिटी |
=\>४०% |
हालचाल करू शकणारे शुक्राणू |
प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी |
=\>३२% |
पुढे सरकत जाणारे शुक्राणू |
नॉर्मल मॉर्फॉलॉजी |
=\>४% |
नॉर्मल दिसणारे शुक्राणू |
डब्ल्यू बी.सी. |
=\<१ |
पांढऱ्या पेशी/ जंतुसंसर्ग |
पी.एच. |
७.२ |
सामू |
सीमेन ऍनालिसिस मध्ये दोष येण्याची कारणे सामान्यतः
जेनेटिक
एंडोक्राइन ग्रंथीचे आजार
इन्फेक्शन्स
जीवनशैली निगडीत जसे धूम्रपान, जास्त प्रमाणात मद्यपान, मानसिक ताण तणाव व स्थूलपणा
तरीही पन्नास टक्के वेळा कारण सापडले नाही असे होऊ शकते.
सिमेनमध्ये शुक्राणूंचे प्रमाण शून्य किंवा कमी असल्यास रक्ताच्या तपासण्या करून,
एफ. एस.एच., टी.एस. एच.आणि टेस्टोस्टेरोन या हार्मोन्सचे प्रमाण पाहिले जाते.
स्क्रोटल सोनोग्रफी व गरज लागल्यास डॉपलर तपासणी केली जाते.
यावरुन निदान होण्यास मदत होते.
कारणानुसार इंजेक्शन्स व ऑपरेशनचा सल्ला दिला जातो.
शुक्राणू अजिबातच तयार होत नसतील तर वीर्य दात्याचे सिमेन वापरून आय.यु.आय. किंवा आय. व्ही. एफ. चा सल्ला दिला जातो.
ओव्ह्युलेटरी: स्त्री बीज अनियमितपणे,कमी वेळा तयार होणे किंवा अजिबातच तयार न होणे.
मासीक पाळीची माहिती घेऊन(मासिक पाळी अनियमित असणे,कमी प्रमाणात रक्तस्त्राव होणे)
सोनोग्राफी व हार्मोन्सच्या आणि रक्ताच्या तपासण्या करून याचे निदान केले जाते.
गोळ्या व इंजेक्शनचा वापर करून यावर उपचार केला जातो.
ट्यूबल फॅक्टर: गर्भनलिकांचा आजार/दोष ,नळ्यांवर सूज, इन्फेक्शन असणे, चिकटलेल्या /बंद असणे.
एच. एस.जी. या तपासणी द्वारे किंवा लॅपरोस्कॉपी करून याचे निदान केले जाऊ शकते.
काही प्रमाणात औषधोपचार आणि आणि शस्त्रक्रिया करून यावर उपचार केला जातो.
गर्भाशय आणि गर्भाशय मुखाचा चे आजार
गर्भाशयात पडदा असणे, गाठ असणे, पिशवी आतून चिकटलेली असणे, खूप लहान ,दुभंगलेली असणे ,गर्भाशय मुखावर सुज/ इन्फेक्शन असणे.
सोनोग्राफी ,एच.एस. जी. आणि हिस्टेरोस्कोपी याद्वारे निदान केले जाते.
गरजेनुसार शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
एंडोमेट्रिओसिस हा आजारही इन्फर्टिलिटीस कारणीभूत होतो.
तरीही पंचवीस ते तीस टक्के वेळा काही कारण सापडले नाही असे होते.
यामध्ये प्रक्रिया केलेले पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या गर्भपिशवी मध्ये सिरींज व नळीच्या मदतीने सोडले जाते.
मासिक पाळीच्या सातव्या दिवसापासून रोज किंवा दिवसाआड सोनोग्राफी करून स्त्री बीज बनण्याची क्रिया तपासली जाते.त्यास ओवव्ह्युलेशन स्टडी किंवा फॉलिकल मॉनिटरिंग म्हणतात.
या काळात स्त्री बीज बनण्यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शन्स घ्यावी लागतात.
सोनोग्राफी करून स्त्रीबीज तयार होऊन बाहेर पडले आहे (रप्चर झाले आहे) याची खात्री केली जाते.
ज्या दिवशी हे घडेल त्यादिवशी पुरुषाचे वीर्य जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाते व एकत्रित शुक्राणूंचे प्रमाण(कमितकमी 0.5 मिलियन) आणि हालचाल चांगली (ग्रेड ३/४)आहे याची खात्री करून असे वीर्य गर्भाशयात सिरींज व नळी मार्फत सोडले जाते.
जर एखाद्या जोडप्याने वीर्य दात्याचे वीर्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे अशा वेळेला सिमेंट बँक मधून वीर्य मागवले जाते या पद्धतीत आवश्यक ती गोपनीयता राखली जाते व नियमांचे पालन केले जाते.
आय यु आय मध्ये यश मिळण्याचे प्रमाण:
प्रति मासिक चक्र १० ते 15%
3 ते 4 सायकल्स नंतर 50%
हे प्रत्येक जोडप्या बाबत इन्फर्टिलिटीची किती व कोणती कारणे आहेत? जोडप्यातील दोघांचे वय काय आहे?आधीच्या प्रयत्नात कितपत यश मिळाले आहे ?आणि त्या जोडप्याची मानसिक आर्थिक शारीरिक तयारी यावर अवलंबून आहे.
तरीही तीन सायकल प्रयत्न केल्यानंतर यश न आल्यास अजून काही तपासण्या आणि लॅपरोस्कोपी चा सल्ला देऊन परत प्रयत्न करता येऊ शकतो.
कोणत्या जोडप्यांमध्ये आय यु आय चा सल्ला दिला जातो?
वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण अतिशय कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे किंवा नसणे, अनेक वर्ष प्रयत्न करूनही दिवस राहत नसतील तर,
वीर्य दात्याचे वीर्य वापरायचे असेल तर ,
आणि ज्याला स्पष्टीकरण नाही अशा प्रकारची इनफर्टिलिटी.
डोनर इंसेमिनेशन
वीर्य दात्या पुरुषाचे सिमेन प्रक्रिया करून स्त्रीच्या गर्भपिशवी मध्ये सिरिंज आणि नलिकेच्या माध्यमातून सोडले जाते.
असे वीर्य सिमेन बँक मधून मागवले जाते.दात्याकडून सिमेन घेण्यापूर्वीच त्याच्या आरोग्याबाबत खात्री करून घेतली जाते. तसेच एचआयव्ही, सिफिलीस, हिपॅटायटिस बी, सी अशा तपासण्या करून मगच वीर्य सुरक्षित पद्धतीने साठवले जाते. वीर्य देतेवेळी त्याबाबतची गोपनीयता राखली जाते. डोनर इंसेमिनेशन करण्यामुळे स्त्रीला व गर्भाला त्या शुक्राणू मुळे काही आजार होणार नाही याची खात्री करून घेतली जाते.
स्त्रीबीज व पुरुषांचे शुक्राणू यांचा संयोग प्रयोगशाळेतील उपकरणांच्या सहाय्याने करून तयार झालेला अति प्राथमिक अवस्थेतील गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात सोडणे.
स्त्रीबीज बनण्याची प्रक्रिया इंजेक्शने व गोळ्या वापरून उत्तेजित केले जाते.स्त्रीला भूल देऊन योनीमार्गातून ओहम/उसाईट पिकप केले जाते.याच काळामध्ये इंडोमेट्रियम उपचार देऊन गर्भधारणेसाठी योग्य तयार केले जाते व तयार केलेले एम्ब्रयो आत मध्ये सोडले जातात.
कोणा बाबत हा सल्ला दिला जातो?
आय यु आय मध्ये यश न मिळाल्यास
जोडप्याचे वय बरेच जास्त असल्यास
पुरुषातील सिमेनचे दोष उपचाराने दुरुस्त होणार नसल्यास.
तणावाची कारणे |
सल्ला/माहिती |
गैरसमज लग्नानंतर किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरू केल्यावर लगेच दोन ते तीन महिन्यात दिवस राहिल्या पाहिजेत |
सशक्त नॉर्मल जोडप्यांमध्ये ही एक वर्षभर नियमित शरीर संबंध ठेवल्या वर दिवस राहण्याचे प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्के आहे तेव्हा नीट माहिती करून घ्या |
घरच्या लोकांची कुरबुर घाई करणं तगादा लावणे आणि स्त्रीला संपूर्ण दोषी ठरवून तिला बोलणं दुस्वास करणं मारझोड करणे |
प्रत्येकानं आपापल्या आई-वडिलांना समजून सांगावे ही त्यांच्या इच्छेचा आम्ही आदर करतो पण अशा प्रकारचा मानसिक ताण आल्यास किंवा छळ केल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत नवरा बायको दोघांनी एकमेकांना आधार द्यावा |
नवरा-बायको दोघांमधील तणाव विशेषत:दिलेल्या वेळी /दिवशी संबंध ठेवण्याबाबत ताण येणे,वारंवार ओव्ह्युलेशन चेक करणे,पाळी येण्याची धास्ती वाटणे. |
आपल्या जोडीदाराची मानसिक स्थिती समजून घ्या आधार द्या असे उपचार घेणाऱ्या इतर जोडप्यांचे मित्र-मैत्रिणींशी बोला डॉक्टरांचा सल्ला किंवा मदत घ्या |
|
|
आर्थिक ताणतणाव: दवाखान्यामध्ये वारंवार जावे लागणे तसेच वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या सोनोग्राफी आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियेचे उपचार हॉस्पिटलमध्ये राहावे लागणे यासाठी बराच खर्च येतो तसेच दर महिन्याला हे उपचार करावे लागत असल्यामुळे काही महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी खर्चाची तयारी करावी लागते |
आपल्याला स्वतःचं मूल व्हावं ही इच्छा अतिशय मूलभूत नैसर्गिक आणि प्रबळ अशी आहे तरीही रिस्थितीतल्या कोणत्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत नाही याचा अंदाज घ्या. उपचार सुरू करण्यापूर्वीच खर्चाचा अंदाज घ्या किती वेळा पण हा उपाय चालू ठेवणार याची निश्चिती करा भावना आणि वास्तव यांची सांगड घाला सध्या तरी हा खर्च इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. |
स्त्री व पुरुष दोघांच्याही स्वतःच्या शिक्षण-करिअर आणि राहणीमानाच्या कल्पना,इच्छा बदललेल्या आहे आहेत. त्या साधताना लग्नाचे वय आणि पहिले मूल होऊ देण्याबाबत निर्णय घेण्याचे वय वाढत जात आहे.. धकाधकीचे- तणावग्रस्त जीवन,नियमित शांत झोपेचा अभाव ,बैठे काम ,व्यायामाचा अभाव ,आहाराच्या बदललेल्या सवयी,खाण्याच्या अनियमित वेळा,जंकफूड कोल्ड्रिंक्स इत्यादीचे आहारातले अतिरेकी प्रमाण,यामुळे येणारे स्थूलपण/ओबेसिटी ,आहारात पोषक द्रव्यांचा अभाव प्रिझर्वेटिव्ह आणि पेस्टिसाइडचे अयोग्य प्रमाण.
याचा एकत्रित परिणाम म्हणून इनफर्टिलिटी च्या या त्रासाला सामोरे जावे लागते.
उपचार सुरू करण्यापूर्वी आणि सुरू केल्यानंतरही सहसा वजन कमी करण्याचा आणि आहारातील पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला दिला जातो.
आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे,कडधान्ये याचा वापर वाढवल्यास चांगला परिणाम मिळतो.
तसेच वजन कमी करणे आणि शारीरिक व्यायाम करणे याचाही उपचारांना चांगला फायदा मिळतो तसेच काही व्यसने जसे तंबाखू,गुटका ,सिगारेट याचा आरोग्याबरोबरच स्पर्म क्वालिटी वरही विपरीत परिणाम होतो. तेव्हा या सवयी सोडल्या तर नक्कीच फायद्याचे आहे.