प्रेगन्सी आणि आहार - समज- गैरसमज

काय खावे,किती वेळा खावे,केव्हा आणि कसे…...समज- गैरसमज

 
 • सकाळी उठल्यानंतर लगेच कोरडा व वास नसलेला पदार्थ खावा जसे मारीचे बिस्कीट चिक्की किंवा पोळीचा चतकोर तुकडा त्यानंतर अर्धा तास पडून राहावे आणि मग ब्रश करावे.
 • मळमळ होत असताना पातळ पदार्थ, (उदा. नारळ पाणी)उग्र/तीव्र वासाचे पदार्थ टाळावेत.
 • एकदम जास्त न खाता दर दीड ते दोन तासाने थोडे थोडे खावे त्यानंतर अर्धा तासाने थोडे पाणी प्यावे.
 
 • घरी स्वच्छता पूर्वक तयार केलेले ताजे जेवण करावे.
 • एकाच वेळेस जास्त खाण्याऐवजी दर दीड ते दोन तासांनी थोडे थोडे विभागून दिवसभरातून सहा ते आठ वेळेला खावे.आपल्या स्वतःच्या सोयीनुसार स्वतःचा आहाराचा तक्ता बनवावा.किती खातो यापेक्षा काय आणि कसे खातो हे महत्त्वाचे.
 • आहार संतुलित असावा. म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटिन्स, फॅट्स, व्हिटामिन्स आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट याचे प्रमाण योग्य असेल असा असावा.
 • बेकरी मधले प्रॉडक्टस् , तळलेले किंवा गोड पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ टाळावेत अथवा कमी प्रमाणात खावेत.
 • उपवास करणे टाळावे.
 

या काळात बाळाचे वजन आणि आकार वाढत असतो त्याच बरोबर शरीरातील सर्व अवयवांची जडणघडण आणि परिपक्वतेकडे वाटचाल होत असते. तसेच पाचव्या महिन्यापासून व त्यानंतर उलटी मळमळ चे प्रमाण कमी होऊन भूक वाढायला लागते, तेव्हा या काळात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

थोडे पण जास्त वेळा खा

दिवसभरातून दोन वेळा तरी फळे आणि कच्च्या स्वरूपात सॅंलड अवश्य द्या.

 

कार्बोहायड्रेट्स =भात, पोळी ,भाकरी.

प्रोटिन्स = डाळी,मोड आलेली कडधान्य                 

मांसाहार, अंडी ,दूध ,पनीर इत्यादी.

फॅटस् = तेल, तूप, लोणी

 
 • प्रेग्नेंसी मध्ये मांसाहार गर्भाला गरम पडतो.

नाही प्रेग्नेंसी मध्ये मांसाहार करण्यात काहीही धोका नाही.

 • केसर घेतल्याने होणारे बाळ बुद्धिमान व गोरे होते

नाही असा काहीही शास्त्रीय सबळ पुरावा नाही.

 • पहिल्या महिन्यापासून शतावरी घ्यावे त्याने दूध भरपूर येते

नाही, पहिल्या महिन्यापासून शतावरी घ्यायची आवश्यकता नाही. बाजारात मिळणारे प्रोडक्टस् बऱ्याच वेळेला साखरे वर बनवलेले असतात त्यामुळे विनाकारण पण जास्त वजन वाढ होते.

 

डिलीव्हरी नंतर जास्त ऊर्जेची गरज असते त्यामुळे आपला कॅलरी इनटेक वाढवावा. खाण्याचे प्रमाण वाढवावे आणि त्यावेळेसच वजन आटोक्यात राहण्यासाठी काही पदार्थ जसे साखर घालून केलेले पदार्थ किंवा जास्त प्रमाणात तूप असलेले लाडू असे पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत.(आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा) पाण्याचे व पातळ पदार्थांचे प्रमाण वाढवावे. दिवसभरात दोन फळे(सगळी) व दोन बाऊल भरून सॅलड नक्की खावे.  दूध वाढवणारे काही जिन्नस जसे लसूण,मेथी ,बदाम, दूध आणि शतावरी याचा आहारात समावेश करावा.

 

काही गैरसमज

 • फक्त फक्त पाणी घातलेल्या भाज्या खाणे चुरून/कालवून, पात्तळ करून खाणे,जास्त प्रमाणात तूप खाणे  या चुकीच्या आहार पद्धती आहेत. याने नुकसान होऊ शकते
 • तसेच पाणी प्यायल्याने पोट फुगलेले राहील हा ही गैरसमज आहे.
 • भात बटाटा वांगी गवारी हे खाल्ल्याने टाके टिकतात व खाज येते हा गैरसमज आहे
 • दही खाल्ल्याने बाळाला सर्दी होते 
 • कडधान्य खाल्ल्याने बाळाचे पोट दुखते, 
 • फळे खाल्ल्याने बाळाला शिंका येतात हे सर्व गैरसमज आहेत.
 

 

वेळ.

कधी.

पदार्थांचे प्रकार उदाहरण म्हणून दिले आहेत.

सकाळी ६/६.३०

सकाळी उठल्यानंतर लगेच

बिस्कीट, चिक्की,असा वाह नसलेला,कोरडा पदार्थ खाऊन थांबावे व अर्ध्या तासानंतर ब्रश करावे.

७.३०/८

…….,........

दूध, सुकामेवा,पेज,कांजी, इत्यादी.

९.३०/१०

नाष्ता

दलिया,उप्पिट,सांजा,इडली -चटणी,ढोकळा,पराठा ,थालीपीठ ,धिरडं ,खिचडी ,सॅलड इत्यादी,अंड.

११.३०/१२

…………..

एखादं फळ.

१.३०/२

दुपारचे जेवण

२पोळ्या/भाकरी.१वाटी भाजी/मांसाहार १वाटी वरण-भात,/कडधान्याची उसळ,१-२वाढ कच्च्या स्वरूपात कोशिंबिरी/सॅलड, चटणी आणि इतर पदार्थ.

४-४.३०

दुपारचा चहा व अल्पोपहार

दूध/चहा,एखाद-दोन बिस्कीटे,एखादे फळ, घरगुती पदार्थ जसे लाडू,गुळ शेंगदाण्याची चिक्की इत्यादी

७-८

जेवण

१-१/२ पोळी/भाकरी,१वाटी वरण-भात/खिचडी इ.

१०

झोपण्यापूर्वी

दूध,फळ,नागली सत्व,लाह्या.

 

रात्री जेवणानंतर परत खावेसे वाटल्यास

दूध-लाह्या,गुळशेंगदाण्याचा लाडू, चिक्की,मारी बिस्किटे २.