हे झाल्यावर फिजिशियन कडून तपासणी करून शस्त्रक्रिया व भूले साठी फिटनेस घेऊन ऑपरेशनचा दिवस ठरवला जातो. ऑपरेशन पाळी नंतर केले जाते.
मिरेना: ऍबनाॅर्मल युटेराईन ब्लीडिंग असेल तर पेशंटची पूर्ण तपासणी करून आणि खात्री करून सुरक्षित असल्यास मीरेनाचा पर्याय दिला जाऊ शकतो मिरेना म्हणजे हॉर्मोन्स असलेली इंट्रायुटेराईन डिवाइस. यातील हार्मोन्स मुळे रक्तस्रावाचे प्रमाण नियंत्रित राहते आणि तिचा गर्भनिरोधक म्हणूनही उपयोग होतो. https://images.app.goo.gl/ttFLdicEByVVyHrW9
एन्डोमेट्रियल ऍब्लेशन: अतिशय जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल आणि औषधांच्या उपचाराला हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल तर या पद्धतीचा उपाय करतात.यामध्ये गर्भाशयातील आवरण म्हणजेच इंडोमेट्रियम उपकरणाच्या सहाय्याने झाळून काढले जाते त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारचे उपचार करून घेणाऱ्या पेशंटने अतिशय नियमितपणे डॉक्टरांच्या कडे तपासणीसाठी जाणे आणि सांगितलेल्या तपासण्या करून घेणे आवश्यक असते असते.