कोव्हिड१९चे इन्फेक्शन, लसीकरण आणि स्त्रिया

) गरोदर स्त्रिया प्रेग्नान्सिच्या कोणत्याही महिन्यात कीविद ची लस घेऊ शकतात

) गरोदर स्त्रीला चालू प्रेगनंसी मध्ये करोना चे इन्फेक्शन होऊन गेले असल्यास 

अशा स्त्रीने डिलिव्हरी नंतर लगेच लस घ्यावी.    

) बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रियाही लस घेवू शकतात.

) करोना च्या सध्याच्या उपलब्ध लस सुरक्षित आहेत आणि त्या गरोदर स्त्रियांना इतर माणसांप्रमाणेच आजारापासून संरक्षण देतात. लस घेतल्या नंतरही इन्फेक्शन होऊ शकते पण आजाराची तीव्रता कमी असते हे लक्षात ठेवावे

) इतर लस,(जसे टी.टी.ची लस) कोव्हिड १९ च्या लस आधी किंवा नंतर १५ दिवसांच्या अंतराने घेवू शकता.

) स्वतःच्या आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांच्या सुरक्षितते साठी:

लस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असे व्यवहार करावेत.

 दोन मास्क वापरावेत,

 वारंवार हात धुवावेत,

 सोशल डिस्टंसिंग सांभाळावे,

 गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

 

 मासिक पाळीच्या कोणत्याही दिवशी लस घेऊ शकता.

लगेच दिसणारे पण सौम्य

  •  जसे सौम्य प्रमाणात ताप येणे,
  •  इंजेक्शनच्या जागी दुखणे, 
  • एक ते तीन दिवस आजारी असल्यासारखे जाणवणे.

२० दिवसांत दिसणारे साधारण ते तीव्र 

  • दम लागणे, छातीत दुखणे,
  •  पोट दुखी उलट्या,
  •  हातपाय दुखणे, हात पाय दाबल्यावर दुखणे, हात पायांवर सूज येणे,
  •  इंजेक्शन च्या जागी रक्त साकळणे,लालसर डाग येणे.

 

उशिराने दिसणारे पण सिरीयस असे:

  • फारच क्वचित वेळा, लाखांमध्ये एखाद्या गरोदर स्त्रीस लस घेतल्यानंतर वीस दिवसांमध्ये काही गंभीर लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करावे लागू शकतात.
  •  जसे हातापायात किंवा शरीराच्या अर्ध्या भागात कमकुवतपणा लुळे पणा जाणवणे,
  •  आकडी/ झटका येणे त्याबरोबरीने उलटी होणे(किंवा होणे)
  •  खूप जास्त प्रमाणात डोकेदुखी उलट्या होणे,
  •  वारंवार उलट्या होणे,
  •  अंधुक- धूसर दिसणे, डोळा दुखणे

 आणि इतर काही गंभीर लक्षणेदिसल्यास तत्काळ उपाय करावा लागतो.

  1. लसीकरणामुळे स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही.
  2.  नवरा बायको ने एकाच कंपनीची अथवा वेगळ्या कंपनीची लस घेतली तरी चालते.
  3. लस घेण्यापूर्वी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याची गरज नाही.
  4. गर्भधारणेसाठी उपचार घेणाऱ्या स्त्रियांनी लस घेतला नंतर काही दिवसांच्या अंतराने गर्भधारणेचे उपाय चालू ठेवावे.
  • गर्भावर अथवा जन्मास आलेल्या बालकावर या लसीकरणाचे दूरगामी दुष्परिणाम व सुरक्षितता याबाबत काहीही निष्कर्ष निघालेले नाहीत.                
  • लसीकरण झाल्यानंतरही दुहेरी मास्क वापरा, वारंवार हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणेसोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे. 
  • लसीकरण नोंदणीसाठी : को विन वर नोंदणी करा.