थायरॉईड ग्रंथी विषयी काही महत्त्वाचे मुद्दे

थायरॉईड ग्रंथी विषयी 

थायरॉईड ग्रंथी साधारण फुलपाखराच्या आकाराची असते आपल्या गळ्यात मध्यभागी श्वासनलिकेच्या समोर असते .

थायरॉईड ग्रंथीतून तयार होणारा थायरॉक्सिन हा हार्मोन आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या कामासाठी आवश्यक असतो मेटॅबॉलिझम साठी अतिशय आवश्यक असलेल्या या हार्मोन शिवाय माणूस जगू शकत नाही.

आईच्या थायरॉईड ग्रंथीने तयार केलेला थायरॉक्सिन तिच्या पोटातल्या बाळापर्यंत रक्ताद्वारे पोहोचतो जो बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतो. पूर्ण नऊ महिन्याच्या बाळाच्या रक्तात बाळाच्या स्वतःच्या थायरॉईड ग्रंथीने तयार केलेल्या थायरॉक्सिन चे प्रमाण हे ७०% असते व आईकडून आलेल्या थायरॉक्सिन चे प्रमाण ३०%असते

जेव्हा थायरॉक्सिन हा रस योग्य प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात तयार होतो तेव्हा त्या स्थितीत हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात.

जेव्हा हा रस योग्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात तयार होतो तेव्हा त्यास हायपर थायरॉइडिझम असे म्हणतात. थायरॉईडच्या या दोन्हीही आजारांचे निदान TSH,(free) T3,T4 TPO antibodies अशा रक्ताच्या तपासण्या करून केले जाते ६)थायरॉईडच्या आजाराची लक्षणे आणि प्रेग्नेंसी ची लक्षणे साधारणपणे सारखी दिसू शकतात.

मात्र या आजाराचे निदान व उपाय न केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते

TSH : 0.4-4.9                 

1st trimester  0.1-2.5.     

2nd trimester 0.2-3.0

3rd trimester  0.3-3.0

Free T4

1st trimester 0.73-1.13

2nd trimester 0.54-1.18

3rd trimester  0.56-1.09

 

लवकर व जास्त प्रमाणात थकवा येणे.

शौचास साफ न होणे.

स्नायूंमध्ये क्रॅम्पस् येणे.

त्वचा कोरडी पडणे .

केस गळणे .

ऍनिमिया .

थंडी गारवा सहन न होणे .

अंगावर सूज येणे .

वजन वाढणे .

स्त्रियांमध्ये :मासिक पाळीच्या तक्रारी .

‌‌‍‍‌गर्भधारणेस अडथळा .

 

कॉमन कारण:हाशीमाटूज थायरॉईडायटिस .

आईसाठी धोके :सौम्य प्रमाणात आजार असल्यास कधी कधी काहीच लक्षणे जाणवत नाहीत मात्र उपचार न केल्यास अथवा तीव्र प्रमाणात आजार असल्यास आईला ॲनिमिया,थकवा, स्नायूंमध्ये क्रॅम्पस् येणे, कमी बाळाचे वजन होणे, प्रसूतीनंतर अतिरिक्त रक्तस्त्राव होणे अशा तक्रारी येऊ शकतात.

बाळासाठी धोके: थायरॉक्सिन हा हार्मोन गर्भाच्या मेंदूच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना:तुम्ही जर प्रेग्नंसी आधी हायपोथायरॉईडचे उपचार घेत असाल तर प्रेग्नंसी मध्ये TSH आणि फ्री T4 ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या औषधाचा डोस प्रेग्नंसी मध्ये वाढवण्याची गरज लागू शकते.

 तसेच प्रेग्नंसी दरम्यान जर हायपो थायरॉइडिझमचे निदान झाले असेल तर त्यासाठीही योग्य प्रमाणात औषध घेणे आवश्यक आहे या गोळ्या सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घ्यायच्या असतात व गोळी घेतल्यानंतर निदान ३० ते ४५ मिनिटे काहीही तोंडावाटे घ्यायचे नसते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे प्रमाण कमी/जास्त करू नये किंवा बंद करू नयेत.

 लक्षणे:

नाडी वेगाने चालणे .

हृदयात धडधडणे .

स्नायूंमध्ये क्रॅम्पस् येणे .

योग्य प्रमाणात आहार घेऊनही वजन न वाढणे .

वजन कमी होणे .

थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढणे .

डोळे बाहेर आल्यासारखे वाटणे बटबटीत दिसणे  .

थकवा .

स्त्रियांबाबत:

गर्भधारणेस अडथळा ,गर्भपात होणे, कमी दिवसाचे मूल होणे ,वार अवेळी निखळणे प्रिएक्लाम्पशिया, हृदयावर ताण येणे.

योग्य उपचार न केल्यास या आजारामुळे गर्भवती स्त्रीस कमी दिवसाचे मूल होण्याचा व  प्रिएक्लाम्पशिया होण्याचा धोका असतो

 बाळासाठीधोके :योग्य उपचार केल्यास बाळाला धोका होण्याचे प्रमाण कमी असते परंतु उपचार न झाल्यास कमी दिवसाचे बाळ होण्याचा धोका असतो

महत्त्वाची सूचना

हायपर थायरॉइडिझम असलेल्या स्त्रीने गर्भधारणा होण्याआधीच आपल्या डॉक्टरांशी बोलून औषधे व त्याचे योग्य प्रमाण याबाबत सल्ला घ्यावा हायपर थायरॉइडिजम मध्ये वापरले जाणारे पी टी यू हे मेडिसिन गर्भावस्थेत घेण्यास योग्य आहे कार्बिमेझोल हे औषध घेत असल्यास ते  बदलण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

 डिलिव्हरी नंतर:

सहा आठवड्यानंतर आईच्या थायरॉईडच्या तपासण्या परत कराव्यात डिलिव्हरी नंतर थायरॉईडच्यासाठी घेत असलेला डोस कमी करण्याची गरज लागू शकते.

डिलिव्हरी नंतर बाळाच्या थायरॉईड फंक्शनची तपासणी जन्मतेवेळी किंवा पहिल्या दहा दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे

POST PARTUM THYROIDIT कधी कधी डिलिव्हरी नंतर थायरॉईडायटीस चा त्रास पहिल्या वर्षभरात अचानक उद्भवू शकतो.

 याला पोस्ट पार्टम थायरॉईडायटिस असे म्हणतात

याची लक्षणे हायपर किंवा हायपो यापैकी कोणतीही असू शकतात.

 सहसा दोन टप्प्यात हा आजार जाणवतो

थायरोटॉक्सिकोसिस:

पहिले काही महिने लक्षणे हायपर थायरॉइडिझम प्रमाणे.

हायपोथायरॉइडिझम:

डिलिव्हरी नंतर चार ते आठ महिन्यानंतर लक्षणे हायपोथायरॉइडिझम प्रमाणे. थायरॉईड ग्रंथीची वाढ होणे.

 उपाय थायरॉक्सिन हार्मोनची रिप्लेसमेंट देणे.

 स्तनपान :

हायपो किंवा हायपर यापैकी कोणत्याही आजारांच्या साठी उपचार घेत असलेल्या स्त्रीने स्तनपान करण्यास काहीही हरकत नाही.

 स्तनपान करणाऱ्या हायपर थायरॉइडिझम चे उपचार चालू असणाऱ्या मातांच्या बाळाच्या रक्ताची तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही कालावधीनंतर पुन्हा करणे आवश्यक आहे.