वैद्यकीय गर्भपात

चोवीस आठवड्यापर्यंतचा नको असलेला गर्भ औषधोपचाराने(७-८ आठवडे) व गरज असल्यास सर्जिकल प्रोसिजर ने (१२आठवड्यापर्यंत)अथवा कळा आणून डिलिव्हरी प्रमाणे काढणे(२४आठवड्यापर्यंत).  नियमानुसार ही प्रक्रिया सरकार मान्य गर्भपात केंद्रातच करावी  अशा केंद्रात आपली आरोग्य विषयक माहिती घेऊन तपासणी केली जाते आपल्यास प्रक्रिये विषयी पूर्ण माहिती दिली जाते.  व आपली संमती घेऊन मगच सुरक्षित गर्भपात केला जातो.  याबाबत संपूर्ण गोपनीयता सांभाळली जाते.

प्राथमिक तपासणी , रक्त लघवीचे तपासणी , आवश्यकता असल्यास सोनोग्राफी , संमती पत्रावर सही घेतली जाते.  गोळ्या दिल्या जातात. औषध घेण्याविषयी माहिती व कौन्सिलिंग केले जाते  पंधरा दिवसांनी फेर तपासणी.  सोनोग्राफी द्वारे सर्व गर्भ पडून गेल्याची खात्री केली जाते.  गोळ्या देण्यासाठी चा कालावधी :गर्भधारणेचे पहिले सात आठवडे हा आहे साधारण तीन ते चार टक्के रुग्णांमध्ये गोळ्या  फेल जाऊ शकतात तसे झाल्यास सर्जिकल प्रोसिजर (डी ऍड इ/क्यूरेटिंग) करावी लागते.  गोळ्यांचे दुष्परिणाम: मळमळ, एसिडिटी पोटात दुखणे,थंडी वाजून ताप येणे.  काही रुग्णांना या व्यतिरिक्तही जास्त त्रासदायक परिणाम जाणवू शकतात. गोळ्या कशा प्रकारे काम करतात? गोळ्या गर्भवाढ रोखतात व गर्भपिशवीमध्ये कळा उत्पन्न करतात  त्याद्वारे गर्भपिशवीचे तोंड मऊ पडून उघडण्यास मदत होते व गर्भ बाहेर टाकला जातो.

यास डी अँड इ असे म्हटले जाते.  दहा ते पंधरा मिनिटे टिकेल एवढी भूल दिली जाते  गर्भपिशवीचे तोंड मोठे करून उपकरणाच्या साह्याने गर्भ शोषून काढला जातो.
प्रक्रिया:
प्राथमिक तपासणी ,  सोनोग्राफी, रक्त लघवीची तपासणी , पेशंटला माहिती देणे व काउंसेलिंग केले जाते  पेशंटला रिकाम्या पोटी ऍडमिट केले जाते.  दहा ते पंधरा मिनिटे टिकेल एवढी भूल दिली जाते.   प्रोसिजर नंतर हॉस्पिटलमध्ये चार ते सहा तास थांबावे लागते  प्रोसिजर नंतर तीन ते पाच दिवस गोळ्या औषधे घ्यावी लागतात  पाच ते आठ दिवस रक्तस्त्राव होतो.  पुढची पाळी एक ते सव्वा महिन्यानंतर येते.

प्रक्रिया

  • तपासणी
  • सोनोग्राफी
  • रक्त लघवीची तपासणी
  • काऊन्सेलिंग
  • संमती पत्रावर सही
  •  पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागते

एकूण प्रक्रियेचा कालावधी २४-४८ तास आहे  यामध्ये पेशंटला कळा येण्यासाठी योनिमार्गात गोळी बसवली जाते. तसेच सलाईन मध्ये कळा येण्याचे औषध दिले जाते. डिलिव्हरी प्रमाणे कळा सुरु झाल्यानंतर गर्भ पिशवीचे तोंड मोकळे होऊन गर्भ बाहेर टाकला जातो.  गर्भ किंवा वार पूर्णपणे बाहेर न पडल्यास डी. ऍण्ड.इ  प्रोसिजर करून सर्व गर्भ व त्याचा अंश बाहेर काढावा लागतो. यानंतर दोन तीन ते पाच दिवस गोळ्या घ्याव्या लागतात .पाच ते आठ दिवस रक्तस्त्राव होऊ शकतो.  पुढची पाळी सव्वा ते दीड महिन्यानंतर येते.

प्रेग्नंसीचे 20 आठवडे (पाचवा महिना) पूर्ण होण्याआधीच गर्भाची वाढ थांबणे, गर्भ गळून पडणे, रक्तस्त्राव होऊन गाठ गळून पडणे यास गर्भपात म्हणले आहे. गर्भपात प्रेग्नेंसी च्या कोणत्या काळात झाला यावरून त्याच्या मागच्या कारणांचा विचार केला जातो. 
कारणे :-
 पहिले तीन महिने (बारा आठवडे)

  • पर्यंत रंगसूत्रातील दोष
  •  रोगप्रतिकारशक्तीचे दोष
  • अंतस्त्रावी ग्रंथींचे आजार
  • जंतू विषाणू संसर्ग
  • गर्भपिशवीत पडदा असणे

 बारा आठवडे ते वीस आठवडे

  • गर्भपिशवीचे दोष जसे गर्भपिशवीत पडदा
  • गाठ असणे
  • गर्भपिशवीचा आकार सदोष असणे गर्भपिशवीचे तोंड लहान/सैल असणे .

सदोष गर्भ 

  • आईच्या रक्तातील दोष (थ्रॉम्बोफिलियाज) जंतू विषाणू संसर्ग

 केमिकल प्रेग्नेंसी

प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आहे परंतु सोनोग्राफी मध्ये गर्भधारणा झालेली दिसत नाही. अशा वेळेस थोडा काळ थांबून सोनोग्राफी /रक्ताची तपासणी करून गर्भधारणे विषयी खात्री केली जाते व गर्भधारणा झाली नसल्याचे सिद्ध झाल्यास पाळी येण्याच्या गोळ्या दिल्या जातात.

ब्लाईटेड ओव्हम

गर्भ अतिशय लहान,बीज स्वरूपात असतानाच नष्ट होणे.  अशा वेळेस सहसा गोळ्या घेऊन गर्भ काढणे व गरज वाटल्यास डी अँड इ नावाची प्रोसिजर केली जाते.

मिस्ड अबोर्शन

 गर्भधारणा झाल्यानंतर काही कालावधीतच गर्भाची वाढ थांबणे ठोके बंद पडणे.

थ्रेटण्ड अबोर्शन

गर्भधारणेनंतर योनिमार्गाद्वारे रक्तस्त्राव होणे, पोट दुखणे अशा तक्रारी आल्यास गर्भपात होण्याची भीती असते अशा स्थितीला थ्रेटण्ड अबॉर्शन ही संज्ञा वापरली आहे.  या स्थितीत सोनोग्राफी करून गर्भ चांगला असल्याची खात्री करून तो टिकावा यासाठी प्रयत्न केला जातो.

कम्प्लीट /इन् कम्प्लीट ऍबॉर्शन

कधीकधी थ्रेटण्ड अबोर्शन किंवा मिस्ड ऍबॉर्शन या अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव व पोट दुखी होऊन संपूर्ण गर्भ नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जातो त्यास कम्प्लीट अबोर्शन म्हणले जाते.  गर्भाचा संपूर्ण अंश बाहेर न पडता काही भाग गर्भपिशवीत राहिल्यास त्यास इन् कम्प्लीट अबोर्शन म्हणले जाते.  इन् कम्प्लीट अबोर्शन मध्ये रुग्णास रक्तस्त्राव व पोट दुखी या तक्रारी चालू राहतात.अशा वेळेला सोनोग्राफीच्या तपासणीने खात्री करुन गरजेनुसार डी अँड या प्रोसिजर ने उपाय केला जातो.

दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा गर्भपात झाल्यास त्या जोडप्यास वारंवार गर्भपात होण्याची तक्रार आहे असे समजले जाते. गर्भधारणेस उत्सुक असलेल्या स्त्रियांपैकी साधारणतः एक ते पाच टक्के स्त्रियांमध्ये असे प्रमाण आढळते.

कारणे

  1. गुणसूत्राचे दोष :-
    गर्भ बीज स्वरूपात असताना गुणसूत्रांचे विभाजन होताना निर्माण होणारे दोष, अनुवंशिकतेने येणारे दोष, रंग सूत्रात अचानक बदल  झाल्याने होणारे दोष. ही कारणे असल्यास गर्भपात प्रेग्नेंसी राहण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात होतो.  प्रमाण 40 ते 50 टक्के.
    तपासण्या:-पालकाचे /जोडप्यांचे कॅरिओटायपिंग, क्रोमोसोमल मायक्रोऍरे, गर्भाची सायटोजेनेटिक तपासणी.
  2. शरीररचने संदर्भातील दोष :-
    गर्भपिशवीचे जन्मजात दोष जसे गर्भपिशवीला आतून पडदा असणे गर्भपिशवीचा आकार सदोष असणे.  नंतर तयार झालेले दोष जसे गर्भपिशवीच्या आत गाठ असणे, मांसल गाठ असणे, गर्भपिशवीच्या आत मध्ये चिकट पदर तयार होणे. प्रमाण 10 ते 15 टक्के.
    तपासण्या:-3Dसोनोग्राफी ,एच एस जी.,हिस्टेरो स्कॉपी.
  3. रोगप्रतिकारशक्ती चे दोष :-
    आईच्या रोगप्रतिकार शक्तीने गर्भ विरोधी प्रतिसाद देणे. ऍण्टि फॉस्फोलिपिड ऍण्टिबॉडी सिण्ड्रोम. प्रमाण: ५-१०%.
  4. अंतस्त्रावी ग्रंथी संदर्भातील कारणे :-
    थायरॉईड ग्रंथीच्या रसाचे प्रमाण कमी असणे, टी एस एच, अँटी थायरॉईड अँटीबॉडी चे प्रमाण जास्त असणे. प्रोलॅक्टीन हॉर्मोने चे प्रमाण जास्त असणे पीसीओडी. डायबिटीस/इन्शुलिन रेझिस्टन्स.
  5. जीवन शैली निगडित :-
    • ​​स्थूलत्व 
    • धूम्रपान मद्यपान
  6. जंतुसंसर्ग /विषाणू संसर्ग :-
    वारंवार गर्भपात होण्यामागे नेमके काय कारण आहे याचा शोध घेतला तरीही वीस ते तीस टक्के वेळा नेमके कारण समजू शकत नाही अशा स्थितीस ईडिओपॅथिक असे म्हटले जाते.  वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्याला त्यांच्या गर्भपात होण्यामागील कारणानुसार तपासण्या व उपचार करून गर्भधारणा यशस्वी होईल व पूर्ण नऊ महिन्याचे बाळ जन्मास येईल अशा प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात. परंतु ही  मानसिकदृष्ट्या त्रासाची, आर्थिकदृष्ट्या खर्चिक व वेळेच्या दृष्टीनेही जास्त लांब प्रक्रिया आहे. अशा जोडप्यांना त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवारांनी समजून घेऊन आधार देणे गरजेचे आहे.