बाळाची पोझिशन बाळ पायाळू आडवे असणे
वार गर्भाशय मुखाच्या अति जवळ किंवा मुखावर असणे
आधीचे दोन वेळा सीझर/गर्भापिशवी वर छेद /व्रण असेल तर.
आईला आधीपासूनचा आजार असल्यास
आईला डायबेटीस असून बाळाचे वजन साडेतीन किलोपेक्षा जास्त असल्यास.
बाळावर अतिरिक्त ताण येवून बाळाचे ठोके खूप कमी किंवा खूप जास्त होणे.(foetal distress)
बाळाने पोटात शी करणे ( MECONIUM) व त्या स्थितीत बाळाच्या जीवितास धोका होईल अशी शक्यता वाटणे
दीर्घ काळ चाललेली प्रसूती( PROLONED LABOUR) व सुरक्षित काळाच्या पलीकडे वेळ लागेल अशी शक्यता दिसल्यास,(Non progress of labour)जसे गर्भपिशवीचे तोंड हवे तसे न उघडणे ( cervical dystocia)किंवा बाळाचे डोके खाली न सरकणे ( non-descent of head)
चिमटा किंवा व्हॅक्यूम वापरून यश न आल्यास.
आधीच्या सीझरच्या कारणाची जर पुनरावृत्ती होणार असेल तर परत सीझर होईल.
जसे आईच्या माकडा चा आकार व इनलेट चा घेर खूप कमी असणे (पूर्ण 9 महिन्याच्या बाळाच्या बाबत)
बाळाची पोझिशन नॉर्मल म्हणजे डोके खाली अशा प्रकारची नसणे
वार गर्भपिशवीच्या मुखाच्या अतिशय जवळ किंवा तोंडावर असणे.
अन्यथा नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रयत्न केले जातात,त्याला ट्रायल ऑफ लेबर( Trial of labour) किंवा व्हजायनल बर्थ आफ्टर सीझर ( VBAC) असे म्हणले जाते.
यासाठी काही अटी आहेत जसे पेशंटला
आपणहून डिलिव्हरीच्या कळा यायला हव्या कारण कळा येण्याची औषधे आधीच्या स्कारवर ताण येवू नये यासाठी देता येत नाहीत.
आधीचा स्कार चांगला असला/राहिला पाहिजे.
बाळाचे ह्रदयाचे ठोके नॉर्मल हवे.मेकोनियम नसले पाहिजे
बाळंतपण योग्य प्रकारे प्रोग्रेस झाले पाहिजे.
असे झाल्यास वेदनारहित प्रसुतीचा पर्यायही वापरता येतो.
पूर्वी एक सीझर झाले आहे अशापैकी पन्नास टक्के स्त्रिया नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकतात.
ठरलेल्या वेळेच्या सहा तास आधी काही खाऊ अथवा पिऊ नये (पाणीदेखील)
सांगितलेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे
ऍडमिट झाल्यावर रक्ताची एक पिशवी( आवश्यकता असल्यास जास्त) राखून ठेवली जाते त्याची तयारी ठेवणे
आपले आधीचे तपासणी रिपोर्ट वगैरे असलेली फाईल घेऊन येणे
आधार कार्ड पेशंटचे व तिच्या मिस्टरांचे घेऊन येणे
आपल्या मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने इत्यादी घरीच काढून येणे
हॉस्पिटलमध्ये आपल्या इच्छेनुसार आणि उपलब्धतेनुसार आपल्याला बेड दिला जाईल.
काही महत्वाच्या फॉर्म्स वर आणि संमती पत्रावर सह्या घेतल्या जातील.
नर्स आपल्याला लागणाऱ्या औषधांची चिट्ठी देतील व ती मागवावी लागतील
प्राथमिक तपासणी होईल, रक्ताचे सॅम्पल घेतले जाईल. एन.एस.टी. नावाची टेस्ट होईल.
नर्स आपल्याला हॉस्पिटलचा गाऊन देतील, काही प्राथमिक तयारी नंतर सलाईन लावून औषधे देतील.
युरिनरी कॅथेटर टाकतील
नियोजित वेळेनुसार आपल्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जातील.
भूल तज्ञ पाठीच्या मणक्यांच्या मधल्या गॅप मध्ये इंजेक्शन देतात व पेशंटचा कमरेपासूनचा खालचा भाग बधिर होतो याला स्पायनल अनेस्थेशिया असे म्हणतात.या प्रकारच्या भूलीमध्ये पेशंट जागी राहते.जनरल अनास्थेशियामध्ये दिल्या जाणाऱ्या गुंगीच्या औषधांच्यामुळे बाळावरही त्याचा परिणाम होतो जे कधी धोक्याचे ठरू शकते.तरीही काही वेळेस अशी भूलही द्यावी लागते.
पेशंटला संवेदना जाणवत नाहीये त्याची खात्री करून पोटावर साधारण १०-१२ सेंटीमीटर चा छेद घेतला जातो यानंतर पोटातील इतर आवरणे दूर करून गर्भपिशवी वर छेद घेतला जातो व बाळ बाहेर काढले जाते यानंतर वार बाहेर काढून त्यानंतर गर्भपिशवीचा व पोटाच्या इतर आवरणांचा छेद शिवून बंद केला जातो आणि त्यानंतर त्वचा शिवून ड्रेसिंग लावले जाते.
दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खात राहा.
साधारण तीन ते चार लिटर पाणी प्या.
घरातले इतर जण जसे आणि जे जेवण घेत आहेत हे सर्व तुम्ही खाऊ शकता .
सर्व फळे पालेभाज्या कडधान्य मांसाहार तुम्ही खाऊ शकता .
स्वच्छ ताजे पोषक अन्न खा.
साखर तूप आणि तळलेले याचे अतिप्रमाणा टाळा
ठरवून /शेड्युल्ड सीझर :
ऐनवेळची/इमर्जन्सी कारणे :
काही परिस्थितीत पेशंटच्या विनंतीवरून सीझर केले जाते
सिझेरियन मुळे पोट सुटते/ राहते :
नाही. सिझेरियन मुळे पोट सुटत नाही तर प्रेग्नन्सी मुळे पोटाचे स्नायूं सैल झालेले असतात व अयोग्य आहारामुळे पोटावर चरबी जमा होते त्यामुळे पोट मोठे व सुटलेले दिसते
पोटाच्या स्नायूंचा व्यायाम व योग्य आहार याने पोट सुटलेले राहत नाही/कमी होते.
सिझेरियन मुळे व स्पायनल अनॅस्थेशिया मुळे पाठ दुखी/ कंबर दुखी होते :
नाही.
प्रेग्नन्सी मध्ये पोटाचे आणि पाठीचे स्नायू कमकुवत होतात त्यामुळे कंबर पाठ दुखते.तसेच बाळाला दूध पाजताना खूप वाकून बसण्याने , चालताना,उभे राहताना आणि बसताना चुकीचे पोस्चर घेणे .चुकीच्या पद्धतीने उभे राहणे बसणे यामुळे पाठदुखी होते. कोअर मसल्सचा योग्य व्यायाम यास उपयुक्त ठरतो.