स्तनपानाचे फायदे

स्तनपानाचे फायदे आई आणि बाळ दोघांनाही आहेत.

बाळाच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्वे,प्रथिने,कर्बोदके आणि इतर आवश्यक घटक आईच्या दुधात योग्य प्रमाणात असतात आणि तेही बाळाला सहन होईल,पचवता येईल अशा प्रमाणात.

 • बाळाला रोगप्रतिकारक शक्तीही मिळते.बाळाचे अनेक आजारांपासून रक्षण होते.
 • आईचे दूध बाळाला गरज लागेल तेव्हा लगेच,योग्य त्या तापमानात उपलब्ध होऊ शकते
 • ते जंतुविरहित असल्याने अतिशय सुरक्षित असते.
 • स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो

आईला होणारे फायदे

 • स्तनपानाच्या कारणाने आईच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होतात आणि लगेच पहिल्या दीड महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.
 • रक्तस्त्राव कमी होतो
 • वजन कमी करणे शक्य होते.
 • स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते.

यासाठी स्त्रीच्या स्तनांमध्ये काही बदल निसर्गतः घडून येतात.

 • स्तने आकाराने मोठ्ठी होतात आणि जड होतात,
 • स्तनाग्रे आणि त्याच्या भोवतीचा गोलाकार भाग ज्याला एरिओला (स्तनमंडल) म्हणतात हे काळे /गडद होतात.
 • कधीकधी स्तनाग्रांमधून पाण्यासारखा द्रवही निघतो.
 • जडावलेली स्तने कधीकधी दुखतातही.

काळजी काय घावी

 • स्तने स्वच्छ ठेवा आणि योग्य मापाच्या ,स्तनांना आधार देतील अशा ब्रेसिअर वापरा.
 • ३४ आठवडे झाल्यानंतर हलक्या हाताने वरून स्तनाग्रंकडे अश्या दिशेने स्तनांना मालिश करू शकता.त्वचा कोरडी असल्यास एरिओलाला पेट्रोलियम जेली लावू शकता.
 • स्तनाग्रे स्वच्छ ठेवा,त्यातली खीळ काढून ती मोकळी करा.
 • स्तनाग्रे खूप लहान/चपटी असल्यास दिवसातून २० ते २५ वेळा बाहेर ओढवीत.
 • स्तनाग्रे आत गेलेली असल्यास सिरींजचा वापर करावा लागू शकतो.
 • कधी ?
  बाळ जन्मल्यानंतर लगेचच ,३० मिनिटांच्या आत.
 • किती वेळ?
  बाळ ओढत आहे तोपर्यंत पाजावे.बाळालाही दूध पिण्यासाठी प्रयत्न करावा लागतो.सुरवातीला प्रत्येक बाळाचा दूध पिण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो. एका स्तनावर एकावेळी पूर्ण पाजावं,पुढच्या वेळी दुसऱ्या स्तनावर घ्यावं. सुरवातीचे दूध पात्तळसर असते ज्याने बाळाची तहान भागते आणि नंतरचे दूध दाट असते ज्याने बाळाची भूक भागते.
 • किती वेळा?
  बाळ प्यायला मागेल तेव्हा तेव्हा (डिमांड फीडिंग )एखादवेळेस बाळ तीन /चार तास झोपलेले राहिले तर त्याला उठवून पाजावे.
 • कसे?
  • बाळाला पाजण्यासाठी आई आणि बाळ दोघेही आरामशीर स्थितीत असावेत.
  • भोवतालचे वातावरण शांत आणि हवेशीर असावे.
  • आईला स्तनपान देणे जमेपर्यंत सकारात्मक राहून भावनिक आधार द्यावा
  • बसून अथवा झोपूनही बाळाला पाजू शकता फक्त रात्री पाजताना आईलाही झोप लागायची शक्यता असल्याने रात्री झोपून पाजू नये.
 • पाजून झाल्यावर बाळाचे समाधान झाल्यास बाळ स्तन सोडून देईल
 • दिवसभरातून बाळाला ५/७ वेळा शू होत असेल तर स्तनपान योग्य होत आहे असं समजावं
 • बाळाचे वजन वाढू लागेल.(पहिल्या दहा ते बारा दिवसात वजन १०-२०% कमी होईल आणि मग वाढू लागेल.साधारण २००ग्रॅमस,दर आठवड्याला असे ३ महिने.)

दूध कमी पडतंय या धास्तीपायी बाळाला वरचे दूध दिल्यास,बाळ आईचे दूध नीट पीत नाहीआणि त्याचा परिणाम आईचे दूध कमी होण्यावर होतो.

१) दूध गळणे:
दूध भरपूर उतरल्यानंतर,कधीकधी बाळाला पाजताना दुसऱ्या बाजूने दूध गळू लागते.हे अतिशय नॉर्मल आहे.आणि सगाळ्यांच्या बाबतीत असे घडेल असे नाही.
उपाय: ब्रापॅडस् किंवा स्वच्छ रुमालाची घडी वापरणे.वापरून झाल्यावर धुवून नीट वाळवणे.

 

२) स्तन दुखणे :
कारणे :

 • दूध जास्त प्रमाणात साठल्यास
 • दूध वाहून नेणाऱ्या नलिकेचे तोंड बंद होवून स्तनाच्या काही भागातले दूध साठून राहिल्यास,
 • दुधाची गाठ झाल्यास
 • स्तनाग्रे अति लहान किंवा आत गेलेली असल्यास दूध बाहेर निघत नाही आणि स्तने ताठरतात.

उपाय:

 • बर्फाच्या पिशवीने शेका.
 • दूध पिळून काढा
 • बाळाला दोन्हीही बाजूने पाजत रहा.
 • नलिका बंद झाल्याचे वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी स्तने स्वच्छ हाताने हाताळणे आवश्यक आहे.

 

 

३) स्तनाग्रांना जखम होणे/आग होणे/हुळहुळणे:
कारणे :

 • बाळाने दूध पिताना जर केवळ स्तनाग्रंवारच ओढले असेल तर.
 • बाळ दूध पीत असताना बळजबरीने दूर केले तर, बाळाच्या जिभेने एरिओलावर दाबले कि दूध सहजपणे बाळाला मिळते पण फक्त स्तनाग्रंवर ओढल्यास हवे तसे दूध मिळत नाही,मग बाळ अजून जोर लावते आणि त्यामुळे स्तनाग्रे हुळहुळतात, जखम होते. किंवा त्वचा अतिशय कोरडी असेल तर ही तक्रार येते.

उपाय:

 • बाळाला पाजताना त्याचे तोंड पूर्ण उघडले आहे ते पाहून स्तनाग्रांबरोबरच एरिओलाचा भागही बाळाच्या तोंडात गेला आहे ना ते पहा.
 • बाळाने तोंड पूर्ण उघडले नसेल तर स्तनाग्राचा स्पर्श त्याच्या गालाला करून पहा.हनुवटीवर आपल्या बोटाने स्पर्श करून पहा.
 • शेवटी येणारे दाट दूध स्तनाग्रंवर लावा.
 • बाळ पीत असताना काही कारणाने दूर करायचे असल्यास आपल्या हाताची करंगळी हळूच बाळाच्या तोंडात सरकवा आणि स्तनाग्र सोडवून घ्या.

 

४) मॅस्टायटिस:स्तनाचा दाह
स्तने खूपच दुखत असल्यास,लालसर झाल्यास, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • काही कारणाने निपल शिल्ड ,ब्रेस्ट पंप अश्या वस्तू वापरणार असाल तर त्याची उपयुक्तता वापरण्याची योग्य पद्धत आणि स्वच्छता याबाबत नीट माहिती करून घ्या.

स्तनपान करणाऱ्या मातेचा आहार सकस आणि चौरस हवा. तिने दर तीन ते चार तासाने आणि प्रमाणबद्ध असे खाल्ले पाहिजे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या,मोड आलेली कडधान्ये,फळे,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ,सुकामेवा याचा योग्य प्रमणात समावेश असावा. नागली,खारीक,बदाम आणि शतावरी याने दूध वाढायला फायदा होतो. मांसाहार ही घेवू शकता. स्तनपान करणाऱ्या मातेला नेहमीसारखेच ,घरातल्या इतर माणसांसारखेच जेवण द्यावे. दूध कमी पडत असेल तर योग्य सप्लिमेंटचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

आईचे दुध स्वच्छ हात धुवून काढून ठेवता येते. काढण्यासाठी काचेची बाटली किंवा झाकण असलेली स्टीलची डबी पाण्यामध्ये ठेवून पाणी १० मिनिटे उकळून घ्यावे. काढून नीटझाकून ठेवलेले दुध चार तासापर्यंत वापरता येवू शकते. फ्रीजमध्ये ठेवल्यास २४ तास टिकते.वापरण्यापूर्वी रूम टेम्प्रेचरला येवू द्यावे.

सर्दी ,ताप,डोकेदुखी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी औषध घेण्याची वेळ आल्यास,संबंधित डॉक्टरांना आपण बाळाला स्तनपान देत आहोत हे सांगणे. जुन्या आजारासाठी काही औषध घेत असाल तरी डॉक्टरांना सांगून औषधात किंवा त्याच्या डोसमध्ये बदल करायची गरज आहे का,त्याचा बाळावर काही परिणाम होतो का याची माहिती करून घ्या.

These are general guidelines for storing human milk at different temperatures. Various factors (milk volume, room temperature when milk is expressed, temperature fluctuations in the refrigerator and freezer, and cleanliness of the environment) can affect how long human milk can be stored safely.

  Storage Location and Temperatures
Type of Breast Milk Countertop 77°F (25°C) or colder (room temperature) Refrigerator 40°F (4°C) Freezer 0°F (-18°C) or colder
Freshly Expressed or Pumped Up to 4 Hours Up to 4 Days Within 6 months is best
Up to 12 months is acceptable
Thawed, Previously Frozen 1-2 Hours Up to 1 Day
(24 hours)
NEVER refreeze human milk after it has been thawed
Leftover from a Feeding
(baby did not finish the bottle)
Use within 2 hours after the baby is finished feeding