रजोनिवृत्ती

साधारण ४२ ते ५५ या वयोगटातील स्त्रीला एक वर्षाच्या कालावधीत एकदाही मासिक पाळी आली नसेल तर तिची पाळी गेली म्हणजेच रजोनिवृत्ती आली असे समजले जाते.स्त्रीच्या स्त्रीबिजकोषांची पाळी येण्यासाठी आवश्यक हारमोन्स (इस्ट्रोजेन) तयार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत बंद होते त्यामुळे रजोनिवृत्ती येते.

मेनोपॉज हा काही आजार नाही तर ती एक अवस्था आहे.प्रत्येकीचा हा अनुभव तिची
अनुवंशिकता, जीवनशैली,आहार आणि याबाबतचा द्रुष्टीकोन यावर अवलंबून असतो.
लक्षणे:

 • पाळीची अनियमितता
 • हॉट फ्लशेस,नाईट स्वेटस्
 • वजन वाढणे,स्थूलपणा.
 • पाय/सांधे दुखणे.लवकर थकवा येणे.
 • पोट गुबारल्यासारखे वाटणे,शौचास साफ न होणे.
 • योनीमार्गाची शुष्कता.संभोगाची इच्छा कमी होणे.
 • वारंवार लघवीला जावेसे वाटणे
 • मूड स्विंगस्, मानसिक हळवेपणा वाढणे.

ही लक्षणे पाळी जाण्यापूर्वी ६-८ वर्षे कमी अधिक प्रमाणात जाणवू शकतात व नंतरही जाणवतात.

मेनोपाँजबद्दल शास्त्रीय माहिती करून घेण्यासाठी.
काही स्क्रीनिंग टेस्टस् बद्दल माहिती व्हावी म्हणून.
काही त्रास जाणवल्यास त्यासाठी कोणते उपचार/पर्याय आहेत , याबाबत माहिती असण्यासाठी.

मेनोपॅाज जवळ येत जाण्याच्या काळापासून व त्यानंतर इस्ट्रोजेन या हार्मोनचे प्रमाण कमी झाल्याने
हाडांची झीज होण्याची गती वाढत जाते व त्यामुळे आणि वाढणाऱ्या वयामुळेही हाडांचा ठिसूळपणा वाढत

जातो.छोट्याशा कारणानेही हाड मोडण्याचा धोका वाढतो. यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि वजन
प्रमाणबध्द ठेवणे आवश्यक आहे.

पोटाची व ओटीपोटाची (ट्रान्स व्हजायनल)सोनोग्राफी
कधी: पाळीच्या पहिल्या पाच ते सहा दिवसांमध्ये
कशासाठी: युटेरस, ओव्हरीज आणि इंडोमेट्रियम यांच्या बाबतीत माहिती मिळण्यासाठी

 • पॅप स्मियर:

कधी: पाळीच्या सातव्या ते दहाव्या दिवसांमध्ये
कशासाठी: गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंग साठी

 •  मॅमोग्राफी:(डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)

कधी: कधीही करू शकतो
कशासाठी: स्तनांच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग यासाठी

 • रक्तातील थायरॉईड हॉर्मोन्सचे प्रमाण

कशासाठी: थायरॉईडच्या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये हे अधिक आहे म्हणून

 • याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, चरबीचे प्रमाण आणि बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्याही करण्याचा सल्ला दिला जातो.

भविष्यातील संभाव्य कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी पॅप स्मिअर सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी या
तपासण्या /स्क्रीनिंग टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.
स्वतःच्या स्तनांची स्वतः तपासणी करण्याची पध्दत शिकून घ्यावी.

मेनोपॉज जवळ येत असलेल्या किंवा झालेल्या स्त्रियांना औषधांच्या स्वरूपात, हॉर्मोनस्-इस्ट्रोजेन आणि
प्रोजेस्टेरॉन देणे म्हणजे हार्मोन थेरपी.
हे गोळ्या, इंजेक्शन ,त्वचेवर लावायचे पॅच,गर्भाशयात ठेवायचे डिवाइस, त्वचेखाली बसवण्याचे इम्प्लांट
अशा स्वरूपात देता येते.हार्मोन थेरपी देताना काही महत्त्वाच्या रक्ताच्या तपासण्या व सोनोग्राफी करून
घ्यावे लागते

हार्मोन थेरपीचे काही साईड इफेक्टस् ही असतात तेव्हा हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व देखरेखी
शिवाय करू नयेत .
ज्या स्त्रियांना अतिशय तीव्र स्वरूपात लक्षणे जाणवत असतील व जीवनशैलीतील बदल आणि नॅान
हॉर्मोनल उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर अशा स्त्रियांमध्ये या पर्यायाचा विचार केला जाऊन
शकतो.

 • आहार: कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण कमी आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असा आहार घ्यावा
 • कॅल्शियमचा पुरवठा करणारा आहार घेणे
 • अन्नघटकातून मिळणारे इस्ट्रोजेन (फायटो इस्ट्रोजेन) याचा आहारात समावेश करणे जसे सोयाबीन, जवस.
 • योग्य प्रकारचा व्यायाम: ज्यामध्ये स्टॅमिना वाढेल असे व्यायाम प्रकार जसे चालणे, सायकलिंग, ट्रेडमिल आणि वेट बेरिंग एक्झरसाइज ज्यामुळे हाडांची व स्नायूंची बळकटी वाढेल तसेच योगासने याचा समावेश असावा.
 • याखेरीज आवश्यकतेनुसार विटामिन डी, बी ट्वेल्व आणि कॅल्शियम यांचे सप्लीमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत